विकास प्रकल्पांच्या देखरेखीबाबत सिडको, पीएमसी, लोकप्रतिनिधींची
संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासन उचित निर्णय घेईल
- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
नागपूर दि. १२ :- सिडको, पीएमसी हद्दीतील विकासकामाचे नियोजन, प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांवर देखरेख, नियंत्रण यासाठी महानगरपालिका प्रतिनिधी, सिडको प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य विक्रांत पाटील यांनी या संदर्भात विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला.
नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका, नैना प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे, विकासप्रकल्प सुरू आहेत. या विकासकामांचा, प्रकल्पांचा मुख्यमंत्री वॉररूममार्फत नियमित आढावा घेतला जात असल्याचेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment