Tuesday, 23 December 2025

पनवेल महानगरपालिका नागरी क्षेत्रात वाढ होत असल्याने पनवेल महानगरपालिकेने सुधारित नागरी विकास आराखडा (

 राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले, पनवेल महानगरपालिका नागरी क्षेत्रात वाढ होत असल्याने पनवेल महानगरपालिकेने सुधारित नागरी विकास आराखडा (डीपी) शासनास सादर केला असून या आराखड्यात रस्ते व मूलभूत पायाभूत सोयी सुविधांचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिकेची सुधारित व एकत्रित प्रारूप विकास योजना शासनाकडे मंजुरीस्तव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.


          खारघर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा खारघर सेक्टर- १६ येथील डीएव्ही स्कूल येथे सुरू होऊन सीबीडी बेलापूर मार्गे सीवूड्स सेक्टर-५२ मधील डीपीएस शाळेजवळ पाम बीच रोडला जोडला जाईल. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नवीन पनवेल रोडसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेकडील रस्ता उपलब्ध असून हा रस्ता जोड रस्त्यामार्फत खारघर कोस्टल रोडला जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.


          तसेच विकास प्रकल्पांच्या कामात सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi