समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार;
एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन
- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
नागपूर, दि. १२ :- नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार मिळावेत यासाठी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यानच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या महामार्गावर एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात विधान परिषदेत उपस्थित लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर, परिणय फुके आणि चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला
No comments:
Post a Comment