Tuesday, 30 December 2025

तुळापूर व मौजे वढू बु. विकास आराखडा शिखर समिती बैठक

 तुळापूर व मौजे वढू बु. विकास आराखडा शिखर समिती बैठक

नागपूरदि. 10 : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पुलास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत  मान्यता देण्यात आली आहे. 

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. या दैवताचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि समाधी स्थळ असलेल्या वढू बुद्रुक येथील विकास आराखडा राबविताना ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्याव्यातअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

             बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारआमदार ज्ञानेश्वर कटके उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेछत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान आणि समाधीस्थळाला नमन करण्यासाठी तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत. त्यामुळे तुळापूर - वढू बु. रस्ता भीमा नदीवरील पुलाद्वारे जोडण्यात यावा. सध्या 14 किलोमीटरचा रस्ता असून नागरिकांना तुळापूरहून वढू बुद्रुक येते येण्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागतो. भीमा नदीवरील पूल केल्याने हा रस्ता साडेसहा किलोमीटरचा होईल. त्यामुळे दोन्ही स्थळांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा वेळ वाचेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi