Tuesday, 30 December 2025

विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

 विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबईदि. २९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससीअध्यक्षपदी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1) अन्वये राज्यपालांनी ही नियुक्ती केली असूनविवेक भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी होईल तोपर्यंत) ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंतभारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1-क) नुसार डॉ. अभय एकनाथ वाघसदस्यमहाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

००००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi