Monday, 15 December 2025

विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी ठोस व धोरणात्मक

 विदर्भातील संत्रामोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.


कृषी विद्यापीठ अंतर्गत 20 मॉडेल नर्सरी ,विरळणी करिता एआय आधारित यंत्रसामुग्रीसंत्रा मॉडेल फार्म तसेच इतर आवश्यक संशोधन करिता कृषी विद्यापीठ यांनी प्रस्ताव सादर करावा ,याबाबत प्राधान्याने कृषी विद्यापीठास भरीव मदत केली जाईल असे नितीन गडकरी यांनी निर्देश दिले. नितीन गडकरी यांनी विदर्भातील फळांचे महत्व आणि शेतकऱ्यांची प्रगती कशी साधता येईल यावर मार्गदर्शन केले.

या बैठकीत सध्या अस्तित्वात असलेल्या नर्सरी कायद्यात सुधारणा करणेविदर्भातील संत्रामोसंबी व लिंबूवर्गीय रोपवाटिका (नर्सरी) सर्वोत्तम दर्जाच्या असो बंधनकारक करणेनर्सरी परवाना देताना ठोस नियमअटी व आवश्यक तांत्रिक बाबींचा स्पष्ट अंतर्भाव करणेप्लँटिंग मटेरियल सर्वोच्च दर्जाचे असणेरूट स्टॉक व मदर स्टॉक चा मानक दर्जा अनिवार्य करणेप्रत्येक नर्सरी धारकासाठी रोप उत्पादनाची किमान व कमाल मर्यादा निश्चित करणे तसेच योग्य Ratio ठरवणेसध्या अस्तित्वात असलेल्या नर्सरींना सुधारणा करण्यासाठी 3-5 वर्षाची मुदत उपलब्ध करून देणेभविष्यातील सर्व नवीन परवाने नव्या धोरणानुसारच जारी करणेरंगपूरजबेरी व अंलिमो रूट स्टॉक ची लागवड व पुरवठा अनिवार्य करणेया रूट स्टॉक चे प्रभावी विकासकार्य एनआरसीसी व पीकेव्ही यांनी पुढाकार घेऊन करणेज्या ठिकाणी बाग नाही तेथे नर्सरी चालविण्यास परवानगी नसणे,  रोपांची गुणवत्ता नियंत्रण व एकसमान दर निश्चित करणेओ एनएचबी चे Accreditation अनिवार्य करणेपॅकेटमधील रोपांची साइज किमान 8x12 बंधनकारक करणेरोपे किती वर्षांपर्यंत विक्रीस योग्य मानली जातील याबाबत स्पष्ट धोरण तयार करणेप्रत्येक रोप लॉट प्रमाणित (सर्टिफाइड) असणे व सर्टिफिकेशनसाठी अधिकृत Norms व Authority निश्चित करणेनर्सरी धारकांसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल तयार करणेज्यावर ते रोपवाटिकेचे फोटो/व्हिडिओ व तांत्रिक माहिती अपलोड करतीलज्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्ता ओळखणे आणि योग्य खरेदी करणे सुलभ होईल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर सविस्तर विचारमंथन करून ठोस निर्णय घेण्यासाठी बैठक संपन्न झाली.

आजच्या झालेल्या बैठकीतील मुद्दे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या निर्णयांमुळे उत्पादन गुणवत्तानिर्यात क्षमता आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता लक्षणीयरीत्या वाढेल असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi