Monday, 15 December 2025

नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न!

 विदर्भातील संत्रामोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न!

नागपूरदि. 14 : विदर्भातील संत्रामोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणेतसेच या प्रदेशातील फळ उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक दर्जा मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने शासन पातळीवर ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.  तसेच रोपवाटिका नोंदणी राष्ट्रीय बागवानी बोर्डाकडे करणे आणि सर्व नर्सरी चे मानांकन बंधनकारक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

विदर्भातील संत्री व लिंबू वर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नागपूरयेथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन)अधिनियम 1969 मध्ये  लिंबूवर्गीय फळपिकांच्या अनुषंगाने सुधारणा करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश्य होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीफलोत्पादन मंत्री भरत गोगावलेकृषी राज्य मंत्री ऍड. आशिष जयस्वालअपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी,कृषी आयुक्त कृषी सुरज मांढरेफलोत्पादन संचालक अंकुश मानेडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi