Monday, 15 December 2025

उस्ताद झाकीर हुसेन यांना 'जागतिक अभिवादन' करण्यासाठी, 50 हून अधिक कलावंतांचा NCPA मध्ये कलाजागर!

 उस्ताद झाकीर हुसेन यांना 'जागतिक अभिवादनकरण्यासाठी50 हून अधिक कलावंतांचा NCPA मध्ये कलाजागर! 

 पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचाही सहभाग

मुंबईदि. 14 :  जागतिक कीर्तीचे तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या प्रथम स्मृतिदिनीत्यांना 'जागतिक अभिवादनकरण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 50 हून अधिक कलावंतविद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब 'माइस्ट्रो फॉरएव्हरया दोन दिवसीय कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. एन सी पी ए तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अनेक कलावंतांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत कला सादर केलेली होतीतसेच त्यांचे उस्तादजींसोबत वैयक्तिक अनुबंधही होते. या कलावंतांच्या यादीत जॉन मॅक्लॉघलिनलुई बँक्सडेव्ह हॉलंडगणेश राजगोपालनरणजीत बारोटव्ही. सेल्वागणेशशंकर महादेवनख्रिस पॉटरसंजय दिवेचागिनो बँक्सअजय चक्रवर्तीअमजद अली खान आणि राकेश चौरसिया यांसारख्या प्रतिष्ठित नावांचा समावेश आहे.

या दोन दिवसीय अभिवादन कार्यक्रमात- संगीत मैफलीव्याख्यान-प्रात्यक्षिकेचर्चासत्रेउस्तादजींचा जीवनप्रवास रेखाटणारे छायाचित्र प्रदर्शन आणि माहितीपट... अशा अनेक बाबींचा समावेश आहे... ज्यामुळे प्रेक्षकांना उस्ताद झाकीर हुसेन यांचे जीवन आणि सांस्कृतिक वारशाचे बहुआयामी आणि हृदयस्पर्शी दर्शन घडेल.

कलावंत आणि चाहत्यांसोबतउस्तादजींच्या पत्नी अँटोनियामुली अनिसा आणि इझाबेलातसेच त्यांचे भाऊदेखील या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तबल्याला नवीन ओळख देणाऱ्या आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या महान अद्वितीय कलावंताच्या आठवणी जागवण्यासाठीत्याला अभिवादन करण्यासाठी हे सारे एकत्र येणार आहेत.

दोन दिवसांचा हा स्मृती महोत्सव 14 आणि 15 डिसेंबर रोजीसकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत NCPA च्या विविध मंचांवर आयोजिलेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग देखील या उपक्रमात आपला सहभाग नोंदवतउस्तादजींना मानवंदना देण्यादृष्टीने प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे या उपक्रमातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण करत आहे. अकादमीच्या प्रभादेवी येथील नूतनीकरण झालेल्या अतिशय सुसज्ज अशा मिनी थिएटर मध्ये रसिकांसाठी या कार्यक्रमांचे विनामूल्य सादरीकरण होणार आहे.

 राज्य शासनाचा सांस्कृतिक विभाग व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी रसिकांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण दिलेले आहे. सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात 9 ते 11.30 व सायंकाळच्या सत्रात 6.30 ते 9 या वेळात रसिकांनी उपस्थित रहावे आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi