महिला सक्षमीकरणाचा जागर - आर. विमला
याप्रसंगी प्रास्ताविक करताना निवासी आयुक्त तथा सचिव, आर. विमला यांनी महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, "हा महोत्सव केवळ चवीचा उत्सव नाही, तर हा आमच्या मातीचा, शेतकऱ्यांचा, परंपरांचा आणि महिला सक्षमीकरणाचा उत्सव आहे. महिला बचत गटांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपल्या मातीशी जोडलेले अन्न खातो, तेव्हाच आपल्या भविष्याची ताकद आपल्यासोबत येते, असे प्रतिपादित करून स्थानिक खा, पौष्टिक जगा, मातीशी नातं जोडा, असे आवाहनही त्यांनी केले
No comments:
Post a Comment