मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, एसएनए स्पर्शमधील उरलेल्या सहा–सात कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक प्रक्रियांही पूर्ण झाल्या असून, त्यांच्याही वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून १० ते १५ जानेवारीदरम्यान निर्णय घेतला जाईल.
सेवा प्रवेश नियमांत बदल करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. हे सर्व निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आहेत, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment