वृत्त क्र. 53
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या
समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम
- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
नागपूर, दि. १२ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारातील विलंब, तांत्रिक अडचणी व समायोजनाच्या मागणीबाबत निर्णायक पावले उचलली आहेत. संबंधित सर्व प्रश्न वेळेत सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.
सदस्य सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर म्हणाले की, केंद्र शासनाच्या नवीन एसएनए–स्पर्श प्रणालीमुळे वेतनास काही दिवस लागले. ऑनलाईन प्रक्रियेत अद्ययावत होण्यास तांत्रिक विलंब झाला. परंतु अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून सर्व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले. यापुढे दर महिन्यात वेळेवर वेतन होईल, यासाठी विभाग पूर्ण जबाबदारीने काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment