2034 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते
प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभ
महाराष्ट्रातून निवडलेल्या 13 वर्षाखालील 60 बालफुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शन
मुंबई, दि.14: मिशन ऑलिम्पिक 2026 अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि 2034 पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून 'प्रोजेक्ट महादेवा' राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतीलअशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे 'प्रोजेक्ट महादेवा' या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ आज वानखेडे स्टेडियम येथे करण्यात आला. 'प्रोजेक्ट महादेवा' हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी, अर्जेंटीनचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डिपॉल, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय लोकप्रिय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्राचे)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस, गोट टूर प्रमोटर सत्तादूर दत्ता, टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनों मोरिया, जिंदाल ग्रुपच्या पार्थ जिंदल, वेदना जिंदल यांनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'प्रोजेक्ट महादेवा' हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल मधील प्रतिभेचा (13 वर्षांखालील) शोध घेवून फुटबॉल मधील उच्च दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या 60 खेळाडूंची (30 मुले, 30 मुली) पाच वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment