Monday, 15 December 2025

प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही

 प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही: सचिन तेंडुलकर

       भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाले कीजागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि त्यांचे सहकारी भारतात आल्याबद्दल आणि तेही मुंबईत आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो.मुंबईकरांनी ज्या प्रकारे या तिघांचे स्वागत केले ते अत्यंत अविस्मरणीय आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आजचा क्षण हा अत्यंत अविस्मरणीय आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही. आज मला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सन 2011 च्या  क्रिकेटच्या विश्वचषकाची आठवण झाली. आजचा क्षण हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. खेळामध्ये खेळाडूंना चिकाटी जिद्द अत्यंत महत्त्वाचे आहे लिओनेल मेस्सी जागतिक दर्जाचा खेळाडू असून त्याच्यामध्ये संवेदनशीलता त्याच प्रकारे त्यांनी या खेळाडूला दिलेल्या उत्तेजन अत्यंत महत्त्वाचे आहे याबद्दल मी मेसेज आभार मानतो आणि मेसीला व त्याच्या कुटुंबांना आरोग्यमय शुभेच्छा देतो.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi