Monday, 15 December 2025

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विधी सल्लागारपदी अॅड. अक्षय विश्वंभर मुळे यांची नियुक्ती

अखिलभारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विधी सल्लागारपदी अॅड. अक्षय विश्वंभर मुळे यांची  नियुक्ती


बीड :
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद विधी सल्लागार मंडळाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अॅड. अक्षय विश्वंभर मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त माननीय श्री. एस. एम. देशमुख सर व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेशजी चिवटे यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.तसेच गेवराईसाठी ॲड श्रीराज शेळके,वडवणीसाठी ॲड अभिजीत कदम,आष्टीसाठी ॲड प्रवीण खाडे यांची नियुक्ती देवडी येथे करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषद व संलग्न संस्थांशी संबंधित कायदेशीर विषय, न्यायालयीन प्रकरणे, मार्गदर्शन व विधी सल्ला देण्याची जबाबदारी अॅड. मुळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारितेशी संबंधित कायदेशीर अडचणींवर मार्गदर्शन तसेच परिषदेला आवश्यक असणाऱ्या विविध विधी विषयक बाबींमध्ये ते सक्रिय भूमिका बजावणार आहेत.

अॅड. अक्षय मुळे हे बीड जिल्ह्यातील अनुभवी व अभ्यासू विधिज्ञ म्हणून परिचित असून सामाजिक व कायदेशीर क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील पत्रकारांना न्यायालयीन व कायदेशीर बाबींमध्ये अधिक सक्षम मार्गदर्शन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या नियुक्तीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. नियुक्तीबद्दल मराठी पत्रकार परिषदेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांनी केले आहे.

अॅड. अक्षय मुळे यांच्या नियुक्तीचे बीड जिल्ह्यातील पत्रकार, वकील व सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi