महाराष्ट्राला भागीदार राज्याचा विशेष दर्जा देण्यात आला असून, हे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईल, असा विश्वासही उद्योगमंत्री सामंत यांनी व्यक्त केला. उद्योग मंत्री श्री सामंत यांनी दालनातील सहभागी सर्व स्टॉलची पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली. राजधानीत अशा मोठ्या मेळाव्यात महाराष्ट्र दालनाची उभारणी राज्य आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे स्टार्टअप्सना गती मिळेल तसेच गुंतवणुकीला चालना आणि बचतगटांना प्रोत्साहन मिळेल, असे श्री सामंत यावेळी यांनी सांगितले.
या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असून, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.
No comments:
Post a Comment