Saturday, 15 November 2025

महाराष्ट्र दालनाची वैशिष्ट्ये: 'एक भारत श्रेष्ठ भारत' संकल्पनावर आधारित भव्य रचना

 महाराष्ट्र दालनाची वैशिष्ट्ये: 'एक भारत श्रेष्ठ भारतसंकल्पनावर आधारित भव्य रचना

भारत व्यापार वृद्धी संस्थेच्या (आयटीपीओ) मार्फत आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने 'एक भारत श्रेष्ठ भारतया  संकल्पनावर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे. हे दालन 1098 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असूनत्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर आधारित आहे. दालनाचा दर्शनी भाग शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्को मानांकन संदर्भात असून ज्यात किल्ले हे संरक्षण आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक म्हणून मांडले गेले आहेत.

दालनात भारताचा मोठा थ्रीडी नकाशा उभारण्यात आला असूनत्यात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार दाखवला आहे. मुख्य किल्ल्यांचे लघु त्रिमितीय मॉडेल्स जसे की रायगडप्रतापगडसिंधुदुर्ग आणि तोरणा यांचा समावेश आहे. प्रवेशद्वार रायगडच्या नगरखाना गेटच्या दगडी रचनेसारखे असूनत्यात शिवाजी महाराजांचा कांस्य सदृश्य थ्रीडी चित्रण आहे. स्वागत कक्ष कोल्हापूरच्या स्वर्ग मंडप शैलीत असूनडावीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जावर आधारित डिझाईन आहेज्यात महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक आणि भाषिक परंपरेचे प्रदर्शन आहे. उजवीकडे शिवाजी महाराजांच्या नौदल दृष्टीकोनावर आधारित दालन असूनते महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण आणि आधुनिक सागरी व्यापार केंद्रांशी जोडते. या दालनाभोवती शासकीय विभागांच्या योजनांचे गाळे उभारले असून, 'एक जिल्हा एक उत्पादनसंकल्पनेवर आधारित थ्रीडी नकाशा आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi