स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी
शासन प्रयत्नशील
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन
नवी दिल्ली, दि. 14 : महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, बचत गट आणि 'एक जिल्हा एक उत्पादन'अंतर्गत उत्पादित वस्तुंना हक्काची बाजारपेठ तसेच छोट्या उद्योगांच्या व्यापारवाढीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
प्रगती मैदान येथे आयोजित 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबळगन, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आणि सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर, यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment