आर्थिक साक्षरता वाढवणे, नागरिकांना वित्तीय दाव्यांच्या प्रक्रियेची माहिती देणे आणि विविध बँक व वित्तीय संस्थांत जमा असलेल्या निष्क्रिय रकमा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेत नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला. खात्यात प्रदिर्घ काळापासून पडून असलेल्या अव्यवहित मालमत्ता परत मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचे मार्गदर्शन मिळाल्याने अनेकांना प्रत्यक्ष मदत झाली. आपल्या रकमेची माहिती मिळण्यासाठी, खात्री करण्यासाठी आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी कार्यक्रम स्थळी विविध बँकांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या जुन्या किंवा निष्क्रिय खात्यांची त्वरित तपासणी , विमा पॉलिसी, मुदतठेवी, पीएफ किंवा इतर वित्तीय साधनांशी संबंधित माहिती, दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मार्गदर्शक माहिती, थेट संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून मिळवता आली.
यावेळी लाभार्थी ग्राहकांना ॲक्टिव्हेशन प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच आर्थिक क्षेत्रातील दावे या विषयावर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बडोदा बॅंकेचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कांतीलाल बाविस्कर यांनी यावेळी आभार मानले.
No comments:
Post a Comment