रिझर्व्ह बॅंकेचे मुख्य महाव्यस्थापक पुनीत पंछोली म्हणाले की, दावा नसलेला ग्राहकांचा जो पैसा आहे तो त्यांना परत मिळावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. अनेक खातेधारकांनी नामनिर्दैश नमूद केलेले नसल्याने या खात्यांबाबत त्यांचे पैसे संबंधितांना परत देण्याची प्रक्रिया करण्यात बॅंकेला अडचण येते. त्यामुळे तो पैसा खातेदाराला वापस करता येत नाही.
तरी खातेधारकांनी आपल्या संबंधित माहिती, नामनिर्देशन या सर्व बाबीची पूर्तता करण्याची खबरदारी बाळगावी. खातेदारांच्या सुविधेसाठी उदगम पोर्टल खुप उपयुक्त असून त्यावरून आपल्या सध्याच्या तसेच जुन्या खात्याची माहिती मिळते, त्याचा लाभ घ्यावा. सर्व खातेधारकांनी आपले बॅंक खाते सक्रिय ठेवावे, केवायसी, संपर्क क्रमांक, पत्ता हा तपशील वेळोवेळी अद्ययावत करावा. आपल्या खात्याच्या व्यवहाराबाबत सतर्क राहावे. यासाठी ग्राहकांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य बॅंकानी करावे, या उपक्रमातून आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्या गेले आहे, असे पंछोली यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment