Saturday, 22 November 2025

युपीएससी व्यक्तिमत्व चाचणीसाठी बार्टीकडून २५ हजारांचे अर्थसहाय्य बार्टी महासंचालक सुनील वारे यांची माहिती

 युपीएससी व्यक्तिमत्व चाचणीसाठी बार्टीकडून २५ हजारांचे अर्थसहाय्य

बार्टी महासंचालक सुनील वारे यांची माहिती

 

मुंबईदि. १९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2025 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी एकरकमी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना बार्टीमार्फत 25 हजार रु. एकरकमी अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.

या योजनेच्या लाभासाठी उमेदवार महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार युपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2025 साठी पात्र ठरलेला असावा. अर्जाचा नमुना http://barti.maharashtra.gov.in  NOTICE BOARD या लिंकवर उपलब्ध असून उमेदवारांनी अर्ज डाउनलोड करून भरल्यानंतर आवश्यक स्व-साक्षांकित कागदपत्रांसह ई-मेलद्वारे पाठवायचा आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये जात दाखलाजात वैधताडोमिसाईल प्रमाणपत्रडीएएफ-II, आधार कार्डदिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) बँक पासबुक प्रतयूपीएससी मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र यांचा समावेश आहे.

पूरक कागदपत्रांसह संपूर्ण अर्ज स्कॅन करून upscbartischeme@barti.in या ई-मेलवर पाठवावा. सर्व कागदपत्रे स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. अधिक माहितीसाठी 020-26343600 / 26333597 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा.

अधिकाधिक पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi