Saturday, 22 November 2025

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण१५ ते २४ डिसेंबर २०२५ईमेल:training.pctenashik@gmail.com दूरध्वनी : 0253-2451032, व्हॉट्सअ‍ॅप: 9156073306

 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या

युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण

 

मुंबईदि.१९ : भारतीय सैन्यदलनौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड  (एसएसबीमुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्स क्रमांक ६४ आयोजित करण्यात आला आहे. हा कोर्स १५  ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षणनिवास व भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी १० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयमुंबई शहर येथे मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी सैनिक वेलफेअर विभागपुणे (डीएसडब्ल्यूयांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-६४ कोर्सचे प्रवेशपत्र व परिशिष्टे डाउनलोड करून पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.

 

एस.एस.बी. प्रशिक्षण कोर्ससाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे.

कम्बाईड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-यूपीएससीकिंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (एनडीए-यूपीएससीपरीक्षा उत्तीर्ण असणे व एसएसबी मुलाखतीसाठी पात्रता मिळालेली असणे आवश्यक आहे.

 

एनसीसी सी’ प्रमाणपत्र ’ किंवा बी’ ग्रेडसह उत्तीर्ण असणे तसेच एसएसबी या पदासाठी एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून शिफारस असणे आवश्यक. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबीसाठी  मुलाखतीचे कॉल लेटर असणे आवश्यक.

 

विद्यापीठ प्रवेश प्रणाली (यूईएससाठी एसएसबी कॉल लेटर असणे किंवा शिफारस यादीत नाव असणे आवश्यक.

 

प्रशिक्षण केंद्राबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांच्याशी खालील माध्यमांतून कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल

ईमेल:training.pctenashik@gmail.com दूरध्वनी : 0253-2451032, व्हॉट्सअ‍ॅप: 9156073306

अधिकाऱ्यांनी इच्छुक युवकयुवतींनी या मोफत  प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi