मुंबई उपनगरातील अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सेतू सुविधा केंद्र हा शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 18 : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नसून शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड सेवा देण्याच्या दिशेने हे केंद्र भविष्यकालीन स्मार्ट प्रशासनाचा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या या जिल्ह्यात नागरिकांचे जीवनमान सुकर व्हावे या अनुषंगाने त्यांना वेगवान, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित सेवा मिळाव्यात या उद्देशाने मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने उभारलेल्या या केंद्रांचे लोकार्पण मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment