पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सांगली येथील कवलापूर येथे होणाऱ्या विमानतळाच्या जागेसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने व्हिजिबिलिटी सर्व्हे लवकरच करण्यात येईल. सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे याठिकाणी ६६.३६ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. या क्षेत्राव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करावे लागणार आहे. यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
सांगली येथील कवलापूर येथे होणाऱ्या विमानतळासाठी लागणारी जमीन विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे करून घ्यावा असे आदेश उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिले.
No comments:
Post a Comment