भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’साठी प्रस्ताव सादर करण्यास
२५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. १४ : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येतात.
या पुरस्कारांसाठी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त व्यक्ती आणि संस्थानी प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावेत असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment