सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे दोन वर्षात
नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा शासनाचा संकल्प
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
· शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा
· विमानतळ प्राधिकरण करणार व्हिजिबिलिटी सर्व्हे
मुंबई, दि. १४ : सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून व्हिजिबिलिटी सर्व्हे करुन याठिकाणी येत्या दोन वर्षात विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. कार्गो व नागरी विमानतळ उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ६६.३६ हेक्टर क्षेत्राव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मंत्रालय येथे सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजीत कदम, सुहास बाबर,
No comments:
Post a Comment