Wednesday, 15 October 2025

दिलखुलास’ कार्यक्रमात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक

 दिलखुलास कार्यक्रमात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे

संचालक डॉ. विजय ठाकरे यांची मुलाखत

 

मुंबईदि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे कामकाज आणि स्वरूपया विषयावर संचालनालयाचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवारदि. 17 , शनिवारदि. 18 आणि सोमवार दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली आहे.

राज्य शासनांतर्गत कार्यरत असलेल्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही संपूर्ण देशातील जुन्या संस्थांपैकी एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्यांच्या शास्त्रीय विश्लेषणाचे कार्य या प्रयोगशाळांमध्ये केले जाते. सध्या पोलीसांसमोर नवनवीन गुन्ह्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसागणिक गुन्ह्याचे स्वरूप बदल आहे. बदलत्या गुन्हेगारीनुसार तपासाकरीता असलेल्या यंत्रणेतही बदल होणे आवश्यक होते. त्यानुसार जलद गतीने तपास पूर्ण होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन’(न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा) ची सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्रात 21 मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचा शुभारंभ करण्यात आले असून महाराष्ट्र देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. या उपक्रमामागील संकल्पनाप्रमुख उद्दिष्ट आणि संचालनालयाचे कामकाज कशा प्रकारे सुरू आहे याविषयी 'दिलखुलासकार्यक्रमातून संचालक डॉ. ठाकरे यांनी माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi