Wednesday, 15 October 2025

विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतला नाही

 विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतला नाही

       - राज्य निवडणूक आयुक्त

 

मुंबई, दि. 1: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.

राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi