Wednesday, 29 October 2025

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये

 उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले कीविकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्यव्यवसाय विकासावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या तसेच इंदापूरपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनी धरणाची साठवण क्षमता अंदाजे ११७ टीएमसी इतकी आहे. उजनी धरणाचे बॅकवॉटर सुमारे ७०-८० किलोमीटर पर्यंत असून या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. येथे गोड्या पाण्यातील निर्यात करण्यायोग्य मासे उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी महाविद्यालय झाल्यास तेथील मत्स्यबीज संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देणे शक्य होईल तसेच इंदापूरबारामतीदौंड,पुरंदर या भागात मोठ्या प्रमाणात शेततळे असल्याने याचा उपयोग शेतकऱ्यांना मत्स्यपालन शेतीसाठी करता येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi