राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील २४ विद्यापीठांच्या कुलगुरुंशी संवाद
राजभवनाला दर तीन महिन्यांनी कार्य अहवाल सादर करण्याची सूचना
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.
विद्यार्थ्यांना केवळ अक्षरज्ञान व पदवी देणे इतकेच कर्तव्य नसून विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्य ज्ञान द्यावे, उद्यमशील बनवावे तसेच विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना जबाबदार नागरिक घडवावे अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंशी साधलेल्या पहिल्या संवादात केली. संवाद सत्राला राज्यातील सर्व २४ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु तसेच निवडक विभागांचे सचिव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment