विद्यापीठांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची पूर्ण प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी तसेच विद्यापीठांचे राष्ट्रीय गुणांकन सुधारावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. महाराष्ट्र हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. आज आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमुळे स्पर्धा वाढत असताना आपल्या विद्यापीठांचे गुणांकन घसरत आहे ही चिंतेची बाब आहे असे सांगून विद्यापीठांनी या संदर्भात पावले उचलावी असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यापीठांनी दर तीन महिन्यांना केलेल्या कार्याचा अहवाल राजभवनाला पाठवावा अशी महत्वाची सूचना राज्यपाल देवव्रत यांनी यावेळी कुलगुरुंना केली. अहवालामध्ये विद्यापीठांनी आपल्या अडचणी - समस्या देखील मांडाव्या असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment