युवक - विद्यार्थी खेळले नाही, मैदानावर गेले नाही व घाम गाळून आपल्या ऊर्जेचा सदुपयोग केला नाही तर त्या ऊर्जेचा ते निश्चितच दुरुपयोग करतील असे सांगून विद्यापीठ - महाविद्यालयांनी आपली क्रीडांगणे व इतर क्रीडा सुविधा सुस्थितीत ठेवाव्या, क्रीडा विभाग बळकट करावे तसेच किती विद्यार्थी खेळावयास जातात व क्रीडा सुविधांचा उपयोग करतात या गोष्टींकडे लक्ष ठेवावे असे त्यांनी सांगितले. याबाबतचा कार्यअहवाल विद्यापीठांनी राजभवनाला पुढील तीन महिन्यात द्यावा अशी सूचना त्यांनी केली.
विद्यापीठांनी महिला व बालकल्याण विभागासोबत कार्य करावे व महिला सशक्तीकरणासाठी विद्यार्थिनींना कौशल्य शिक्षण द्यावे असे त्यांनी सांगितले. विद्यापीठांनी आपले प्रशासन सुधारले पाहिजे व ते अधिक स्वच्छ व पारदर्शक केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
No comments:
Post a Comment