देशाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर युवक हीच आपली संपदा आहे. आजचे विद्यार्थी साक्षेपी असून शिक्षक किती अद्ययावत आहेत, ते बोलतात कसे, चालतात कसे, वेळेवर येतात की नाही या सर्व गोष्टी पाहत असल्यामुळे शिक्षकांनी अद्ययावत तसेच वक्तशीर असले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यापीठ - महाविद्यालयांनी आपली वसतिगृहे, भोजन कक्ष, स्वच्छतागृहे नीटनेटकी आहेत की नाही हे तपासले पाहिजे. आपण हिमाचल प्रदेश येथे राज्यपाल असताना स्वतः विद्यापीठांच्या स्वच्छतागृहांची वाईट दशा पाहिली होती असे सांगून कुलगुरु - अधिकाऱ्यांनी वसतिगृहे - मेस नीट आहेत की नाही, हे पाहावे; अधूनमधून विद्यार्थ्यांसह तेथे भोजन करावे. सर्वच गोष्टी वॉर्डनच्या भरवशावर सोडू नये असे राज्यपालांनी सांगितले.
No comments:
Post a Comment