विद्यापीठांनी वृक्षारोपण, व्यसनमुक्ती या कार्यात आपल्या विद्यार्थ्यांना तसेच रासेयो व एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
भारतीय ज्ञान प्रणाली लागू करून विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. विद्यापीठांनी शाळांना भेटी देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेतल्यास उच्च शिक्षणातील युवकांचे प्रमाण सध्याच्या २७ टक्क्यांहून वाढेल असे त्यांनी सांगितले.
पदवीनंतर युवक कोणत्या क्षेत्रात जातात याची माहिती विद्यापीठांनी ठेवावी तसेच माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडून ठेवावे व त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करावे असे राज्यपालांनी सांगितले.
आपण गुजरात येथील विद्यापीठात स्वतः हाती झाडणी घेऊन सात दिवस स्वच्छता केली आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये देखील आपण अशी भेट देऊ असे राज्यपालांनी यावेळी कुलगुरूंना सांगितले.
No comments:
Post a Comment