इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत
प्रस्ताव सादर करावा
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि.२८ : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ.रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव मगर हे मंत्रालयातून तर पुणे विभागीय अतिरिक आयुक्त डॉ.स्वाती देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नितीन पाटील हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment