योजनांचा लाभ घ्या, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आपल्या शेतीला नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन करतानाच शेतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केल्यास महाराष्ट्र राज्य शेतीमध्ये अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कृषी आयुक्त श्री. मांढरे म्हणाले, आपले उत्पादन दुप्पट करण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र उत्पन्न दुप्पट न होता उत्पादित पिकाला योग्य बाजारभाव कमी मिळत असल्याने कमी झाले आहे. त्यासाठी उत्पादित कृषीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी मालाचा बाजारभाव स्वत: कसा ठरविता येईल यासाठी व्यापारी पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध विभांगाच्या समन्वयाने काम होणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
श्री. आवटे यांनी प्रास्ताविकात या योजनेंतर्गत राज्यातील ९ जिल्ह्यात पाच वर्षाचा आराखडा करून कृषी विकासाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले
No comments:
Post a Comment