कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्र नव्या परिवर्तनाच्या दिशेने
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एचपी ड्रीम्स अनलॉक्ड उत्सवांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 11: आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या साधनांना भौगोलिक सीमा नाहीत त्यामुळे श्रीमंत-गरीब, जाती, भाषा यांचा फरक कळत नाही. म्हणूनच हे तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयांच्या कल्पनांना आकार देऊ शकते असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या उत्सवाचे मेहबुब स्टुडिओ, बांद्रा येथे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
कार्यक्रमाला एचपी इंडिया व्यवस्थापकीय संचालिका इप्सिता दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, विपणन प्रमुख आकाश भाटिया, कायदेशीर व शासकीय व्यवहार विभाग प्रमुख राजू नायर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment