या संदर्भात विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी सांगितले की, तांडा आणि वस्त्यांचा विकास म्हणजे समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याची संधी देणे. शासनाने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी दिलेला हा निधी ग्रामीण विकासासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. या सर्व कामांची अंमलबजावणी दर्जेदार, पारदर्शक आणि जनाभिमुख पद्धतीने करण्यात यावी.
सभापती प्रा.शिंदे यांनी या निधीच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले की, ही योजना तांडा आणि वस्त्यांमधील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवेल. मूलभूत सुविधा निर्माण होऊन सामाजिक न्याय आणि समान संधीची भावना अधिक दृढ होईल.
या योजनेच्या अंमलबजावणीनंतर कर्जत - जामखेड तालुक्यातील या १५ गावांमध्ये तांडा व वस्त्यांमधील रस्ते, वीज, पाणी आणि सार्वजनिक सोयीसुविधा सुधारतील. नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि ग्रामीण भागातील वंचित समाजघटकांचा आत्मविश्वास वाढेल. शासनाच्या या निर्णयामुळे मतदारसंघात सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचेही सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment