प्रधानमंत्री मोदी यांनी पहिल्यांदा सहकाराचे महत्त्व समजून घेतलं आणि स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आणि सहकारातला कार्यकर्ता म्हणून पहिले सहकार मंत्री म्हणून श्री.शाह यांना जबाबदारी देण्यात आली. सहकारमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी वेगाने निर्णय घेऊन या क्षेत्रातील धु्रिणींना चकित केले. राज्यातल्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ८ ते १० हजार कोटींची मदत देण्यात आली. सहकार चळवळ रुजविण्याचे कार्य केंद्र सरकारच्या चांगल्या निर्णयाने होत आहे. साखर कारखान्याच्या सर्क्यूलर इकॉनॉमी विकसित करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. साखर कारखान्याचा मालक शेतकरी आहे, म्हणून त्याच्या पाठीशी शासन उभे राहील, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असून लवकरच भरीव मदत करण्यात येईल, यात केंद्र सरकारचेही सहकार्य मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
No comments:
Post a Comment