लोणी - प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लोणी-प्रवरानगर परिसरातून महाराष्ट्रातला नाही तर देशाला सहकाराचा वारसा मिळाला. शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो हे या भूमीने दाखवून दिले. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकार क्षेत्रातील साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली.शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावेत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आणि त्यांचा हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाड जपला. त्यांनी सहकार, शेतीपुरते कार्य मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज, प्रवरा को-ऑपरेटिव्ह बँक, शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे. त्यानंतरही पुढील पिढीने हे कार्य पुढे नेल्याने आज लोणी-प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते.
No comments:
Post a Comment