कोरियाच्या वाणिज्य दूतावासाचे डोंगवान यू म्हणाले, “मुंबई आणि सोल दोन्ही शहरांची ऊर्जा एकसारखी आहे. के-हार्मनी फेस्टा सांस्कृतिक देवाण-घेवाण, पर्यटन आणि भविष्यातील मैत्रीचा सेतू उभारण्यास मदत करील.” कोरियन सांस्कृतिक केंद्राचे संचालक ह्वांग योंग यांनी सांगितले, के-हार्मनी फेस्टा या महोत्सवाच्या माध्यमातून भारत आणि कोरिया यांच्यातील पर्यटन आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण मजबूत करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.”
महोत्सवाच्या उत्तरार्धात ‘कुक्किवॉन तायक्वोंडो डेमोन्स्ट्रेशन टीम’ची शक्ती दर्शवणारी कसरत, पारंपरिक कोरियन संगीतावर ‘एस-फ्लावा (S-Flava)’ द्वारे बी-बॉय डान्स, ऐतिहासिक पारंपरिक नृत्य ‘सोगो’ ज्यात भारतीय शास्त्रीय नृत्य कथ्थकच्या घटकांचा सुंदर समावेश होता. त्याचबरोबरीने लोकप्रिय के-पॉप बॉय बँड ‘यूनाईक’चे सादरीकरण यांचाही समावेश होता, या कार्यक्रमाला युवा प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
No comments:
Post a Comment