Thursday, 16 October 2025

मंडणगड औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण करा

 मंडणगड औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण करा

- राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. 15 : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड परिसराच्या औद्योगिक विकासासाठी ' एमआयडीसी' ची निर्मिती करणे गरजेचे आहे. या भागात उद्योग येण्यास तयार आहेत. त्यामुळे महामार्गलगत जागेची निश्चिती करून सर्वेक्षण करावे, असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले.

बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे एमआयडीसीचे सह आयुक्त कुणाल खेमनार, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, क्षेत्रीय अधिकारी वंदना खरमारे तर मंत्रालयात उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, अवर सचिव किरण जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi