Saturday, 25 October 2025

राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेअंतर्गत

 राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आली होती. यातील जय मल्हार मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी संस्थामुंबई शहर या संस्थेचा प्रस्ताव एनसीडीसीदिल्ली यांच्याकडून मंजूर झाला आहे. प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत राबविण्याच्या निर्देशानुसार या नौकांचे बांधकाम उडुपी कोची शिपयार्ड लिमिटेडमालपे (कर्नाटक) येथे करण्यात आले आहे.

प्रत्येक नौका १८ ते २२ मीटर लांबी४०० ते ६०० एचपी इंजिन क्षमतास्टील हल (Hull) बांधणीरेफ्रिजरेटेड फिश होल्डतसेच जीपीएसइको साऊंडरव्हीएचएफ रेडिओएआयएस आणि रडार यांसारख्या अत्याधुनिक नेव्हिगेशन व संप्रेषण प्रणालींनी सुसज्ज आहेत. या नौका १० ते १५ दिवसांच्या बहुदिवसीय मासेमारी मोहिमांसाठी योग्य असूनट्यूना लाँगलाईन व गिलनेट ऑपरेशन्ससाठी सक्षम आहेत. सर्व सुरक्षा मानके डीजी शिपींग यांच्या नियमानुसार आहेत.

 

या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹२०.३० कोटी असून त्यामध्ये पुढील निधी घटकांचा समावेश आहे:

एनसीडीसी कर्ज सहाय्य: ₹११.५५ कोटी

केंद्र हिस्सा : ₹४.०३ कोटी

राज्य हिस्सा : ₹२.६८ कोटी

लाभार्थी संस्था हिस्सा: ₹२.०३ कोटी

या योजनेस केंद्र शासनाकडून दि. २७ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

या दोन नौकांच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्रात खोल समुद्रातील शाश्वत मासेमारीचा नवा अध्याय सुरू होणार असून मच्छीमार सहकारी संस्थांना खोल समुद्रात बहुदिवसीय मासेमारी करता येईलकिनारी मासेमारीवरील दडपण कमी होईल, डीप सी ट्यूना फ्रॉम महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ट्यूना निर्यातीस चालना मिळेलब्लू इकॉनॉमी सशक्त होईलआणि किनारी मच्छीमारांचे उत्पन्न वाढेल.

हा प्रकल्प आधुनिक मासेमारी तंत्रज्ञानशीतसाखळी सुविधा व सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी — विशेषतः एसडीजी १२ (जबाबदार उपभोग व उत्पादन) आणि एसडीजी १४ (पाण्याखालील जीवन) — सुसंगत आहे. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखत मच्छीमारांच्या उपजीविकेचे शाश्वतीकरण साध्य होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi