भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो
सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त यंदाचा राष्ट्रीय एकता दिवस विशेष असेल
यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या अनोख्या सोहळ्यात गुजरातमधील
नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
विविधतेमध्ये एकतेचा संदेश देण्यासाठी, विविध राज्ये आणि
केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ संचलनात सहभागी होणार
मुंबई, दि. 24 : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय एकता दिवस भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यंदाचा राष्ट्रीय एकता दिवस हा विशेष सोहळा ठरेल. यंदाचा उत्सव अनेक प्रकारे आगळा ठरेल आणि तो कायम स्मरणात राहील.
राष्ट्रीय एकता दिनाचा वार्षिक उत्सव देशवासीयांना स्वतंत्र भारताच्या निर्मितीत आणि 562 संस्थानांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचण्यामध्ये सरदार पटेल यांनी बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेची आठवण करून देतो. त्यांचे नेतृत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रति असलेल्या अढळ वचनबद्धतेमुळे, सरदार पटेल यांना "राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार आणि भारताचे लोहपुरुष" म्हणून आदरणीय मानले जाते.
यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या अनोख्या सोहळ्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जाईल. संचलनादरम्यान, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि राज्य पोलिस दल त्यांचे कौशल्य, शिस्त आणि शौर्य प्रदर्शित करतील. या वर्षी राष्ट्रीय एकता दिनाच्या संचलनमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी), तसेच आसाम, त्रिपुरा, ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांचे पोलीस दल आणि राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी) यांच्या तुकड्यांचा समावेश असेल. या संचलनात घोडदळ आणि उंटांवर स्वार झालेल्या तुकड्या, तसेच देशी कुत्र्यांच्या प्रजाती आणि विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींची प्रात्यक्षिके असतील.
No comments:
Post a Comment