प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन
· माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम
मुंबई, दि. २४ : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
खोल समुद्रातील मासेमारी नौका प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत राबविण्यात आला असून, यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) यांचे कर्ज स्वरूपात आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे.
या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील मच्छीमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (ईईझेड) ट्यूना व इतर सागरी संसाधनांना प्रोत्साहित करणे, तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.
No comments:
Post a Comment