आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ आणि ‘पोषण माह’
सांगता कार्यक्रम उत्साहात साजरा
मुंबई, दि. १४ : मुलींच्या सक्षमीकरणाला आणि त्यांच्या मानसिक बळकटीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ आणि ‘पोषण माह’ सांगता कार्यक्रम महाराष्ट्र स्टेट वूमेन्स कौन्सिल आशासदन, उमरखाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
“मी मुलगी आहे, मी बदलत आहे : संकटाच्या आघाडीवर असलेल्या मुली” या २०२५ वर्षातील संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, पोद्दार रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. ऋतुजा गायकवाड यांनी पोषण विषयक मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment