Tuesday, 14 October 2025

परिवहन कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट

 परिवहन कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच २०२०-२४ दरम्यानच्या वेतन फरकाची वाढीतील रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये  देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहेअसे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi