Wednesday, 15 October 2025

तळोजा एमआयडीसीतील भूखंड विभाजन प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करावा

 तळोजा एमआयडीसीतील भूखंड विभाजन प्रकरणी

चौकशी करून अहवाल सादर करावा

- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि. १४ : तळोजा एमआयडीसीतील भूखंड विभाजन प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावाअसे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवनात तळोजा एमआयडीसी येथील ए-३ भूखंड तक्रारीसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी गृह विभागाचे कक्ष अधिकारी हेमंतकुमार मोहनपोलीस निरीक्षक संजय पाटीलउद्योग विभागाचे अवर सचिव किरण जाधवएमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारीमहादेव इम्पेक्सचे प्रतिनिधी व तक्रारदार उपस्थित होते.

तळोजा एमआयडीसी येथील ए-३ या भूखंडाबाबत महादेव इम्पॅक्ट्स् कंपनीने नियमांचे उल्लंघन करत अवैधरित्या भूखंडाचे विभाजन करून इतर उद्योजकांना विक्री केल्याची तक्रार आहे. नियमानुसार उद्योग सुरू झाल्यानंतर व तो बंद पडल्यासच भूखंड विभाजनाची तरतूद आहेमात्र संबंधित उद्योगाने  कोणताही उद्योग सुरू न करता थेट भूखंड विभाजन करून विक्री केली. या प्रकरणात एमआयडीसीमार्फत सखोल चौकशी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले.

या चौकशी पथकामध्ये पोलीस आयुक्तनवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीएमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रांत अधिकारीपनवेल यांचा समावेश केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi