जिल्हा स्तरावरील पदयात्रा (31 ऑक्टोबर – 15 नोव्हेंबर 2025)
प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांच्या कालावधीत आठ ते दहा कि.मी. पदयात्रा आयोजित करण्यात येईल. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून, आत्मनिर्भर भारताची शपथ घेण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करणार आहेत. क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकरिता आयोजक म्हणून असणार आहे.
निबंध आणि वादविवाद स्पर्धा : सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये (नाटक), नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमांचा समावेश, महिला कल्याण शिबिरे, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वदेशी उत्पादनांना चालना देणारे अभियान "गर्व से स्वदेशी" प्रतिज्ञा, शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, वादविवाद, परिसंवाद, पथना
या उपक्रमासाठी सर्व नोंदणी MY Bharat Portal वर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. https://mybharat.gov.in/
अधिक माहितीसाठी युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment