जिल्हा स्तरावरील पदयात्रा (31 ऑक्टोबर – 15 नोव्हेंबर 2025)
प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांच्या कालावधीत आठ ते दहा कि.मी. पदयात्रा आयोजित करण्यात येईल. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून, आत्मनिर्भर भारताची शपथ घेण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करणार आहेत. क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकरिता आयोजक म्हणून असणार आहे.
No comments:
Post a Comment