सरदार@150 एकता अभियानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे
- क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई दि. १६ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने 'सरदार@१५० युनिटी मार्च' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मोहिमेत राज्यातील जास्तीत - जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
सरदार@150 एकता मोहिमेचा भव्य शुभारंभ
या मोहिमेअंतर्गत “विकसित भारत पदयात्रा” उपक्रमाद्वारे युवकांमध्ये देशभक्ती, एकता आणि नागरी जबाबदारी जाणीव, राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणे, नागरी सहभाग वाढविणे आणि युवकांमध्ये एकतेची व देशभक्तीची भावना रुजविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तराबरोबरच राज्यातही सरदार@150 एकता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रीय एकतेतील योगदानाचे स्मरण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे भारताचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्कर्ष साधणे व एकात्मता वाढवणे यावर भर असणार आहे. या मोहिमेत युवकांना सहभागी करून राष्ट्रनिर्माणात त्यांना सक्रियपणे सहभागी करणे, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागविणे ही मुख्य प्रेरणा आहे. राज्यात जिल्हा स्तरावर पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment